धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली.चोरटे सीसीटीव्हीत कैद.
बीड शहरातील सुभाष रोडवरील घटना.

बीड शहरातील गजबळलेल्या ठिकाण सुभाष रोडवर एका दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरून धूम ठोकली. या घटनेमुळे शहरात एकच खळबबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिनाक १८ फेब्रुवारी रोजी सुभाष रोडवर सायंकाळी एक महिला जात असताना दुचाकी(पल्सर टू ट्वेंटी)या मोटरसायकलवर दोघांनी साखळी चोराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून घेऊन धूम स्टाईल पळून गेले.त्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे दिसत आहे.यातील दुचाकी चालवणाऱ्याने हिरवा शर्ट परिधान केलेला असून मागचा आरोपी पांढरा शर्ट परिधान केलेला असून त्याच्या डोक्यावर पांढरी कॅप आहे.
घटना झाल्यानंतर बीड शहरातील काही ठिकाणी शहरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते दिसतात परंतु यापेक्षा स्पष्ट चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने आरोपीचा शोध अडथळे निर्माण होत आहेत.
पोलीस त्यां साखळी चोरांच्या मागावर आहेत आणि लवकरच त्यांना पकडण्यात येईल व अशा आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसातर्फे योग्य बक्षीस देण्यात येईल त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती माहिती बीड शहर पोलिसांचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे.