गायकवाड मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय.
या घटनेची सकल चौकशी करावी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी.

बीड दि. २६ (प्रतिनिधी): – परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील रेवली शिवारात वीटभट्टीवर काम करणाऱ्या संतोष गायकवाड या २० वर्षीय तरुणाचा नग्नावस्थेत मृत देह आढळून आला होता. ही आत्महत्या नसून यामध्ये घातपाताचा सशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केलेली आहे.सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत संतोष गायकवाड (वय २०) रा.साळी ब्रम्हापुरीता. सोनपेठयाचा मृतदेह आढळून आला होता. यामध्ये मयत तरुणाच्या नातेवाईकांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मात्र त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु यामागे घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.आत्महत्या करणारा तरुण नग्न होऊन विष कसा घेईल ? मृत देहाची अवस्था पाहता हा प्रकार घातपाताचा असावा असे देखील ऑल इंडिया दलित पँथर सेनेने म्हटले आहे. या भागात अशा घटना नैसर्गिक दाखविल्या जातात,हा त्याचा एक भाग असू शकतो असेही ऑल इंडिया पँथर सेनेचे म्हणने आहे.या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी, मोबाईल लोकेशन तपासून खरा प्रकार काय आहे ? हे लोकांसमोर आणावे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेकडून करण्यात आली आहे.