पोलिसांकडून बीड जिल्ह्यात वाहनांची धरपकड,आठ लाखाचा दंड वसूल.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत ॲक्शन मोडवर

बीड पोलीस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बीड जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात कारवाईला वेग आल्याचे दिसत असून गुंडगिरीला, दादागिरीला आळा बसावा म्हणून हद्दपारी व गुंडांना तडीपार देखील केले जात आहे.
आज दिनांक 27 /2/2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशाने, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांना वाहन तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वाहतूक शाखा आरसीपी यांनी संयुक्तरीत्या जिल्हाभरात वाहन तपासणी करत वाहन चालकाकडे परवाना, इन्शुरन्स व इतर कागदपत्राची तपासणी करून दंड आकारण्यात आला.
बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी टोल नाका, केज टोल नाका, चुंबळी फाटा ,धारूर टोल नाका, बर्दापूर टोल नाका, माजलगाव परभणी टी पॉइंट ,इतके कॉर्नर परळी, अंभोरा चेक पोस्ट इत्यादी ठिकाणी वाहतूक चलान वसुलीचे मोहीम राबवून 1028 चलनाचे 820550( आठ लाख वीस हजार पाचशे पन्नास) रुपये रोख वसूल करण्यात आले व 237 केसेस करून एक लाख 47 हजार दंड आकारण्यात आला.