ताज्या घडामोडी

वाल्मीक कराडसह आठ आरोपी विरोधात सीआयडीने दाखल केले १००० पानाचे चार्जसीट.

हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठीच लांबलचक दोषारोपपत्र...प्रकाश आंबेडकर.

मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.

या प्रकरणात सर्वच आरोपींना मकोका लागू झाला असून न्यायालयीन चौकशीही सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी मस्साजोग ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी आपल्या काही मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.

  मस्साजोग हत्या प्रकरणात वाल्मीकच आका असल्याचे दोषारोपपत्रात उलगडा.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातसीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजारपानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली व नंतर संतोष देशमुखांचा खून झाला अशी मांडणी सीआयडीने दोषारोपपत्रात केली आहे. त्यामुळे याप्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे दोषारोपत्र न करता, वाल्मीक कराड सह ८जणांविरोधात एकच दोषारोपत्र दाखल केले.

हे प्रकरण फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी प्रयत्न.

प्रकरणाचे गांभीर्य पाहता या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने होण्याची शक्यता आहे. अॅड. निकम यांची नियुक्ती आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले लक्ष यामुळे हे प्रकरण लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न असणार आहे.

खंडणी,हत्या गुन्ह्यात हे आरोपी अटकेत.

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे,सुधीर सांगळे, प्रतिक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे व जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल आहे. तर, कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे.त्याचा शोध घेण्यास पोलिसांनी अद्यापही यश आले नाही.

चार्जशीट दाखल करण्यासाठी १८० दिवसाचा अवधी असताना व यातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असताना देखील केवळ ८० दिवसात चार्जशीट दाखल करण्याची घाई सीआयडी कडून का केली जात आहे?असा प्रश्न बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button