मनसेचा बीड नगरपालिके समोर शिमगा,बोंबाबोंब आंदोलन.
नगरपालिका भ्रष्ट कारभार विरोधात घोषणा देत पाण्याचे मडके फोडून केला निषेध.

मुख्याधिकारी निता अंधारे यांची तात्काळ बदली करा-वर्षाताई जगदाळे.
बीड प्रतिनिधी बीड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्व सामान्य बीड शहर वासियांना बसत आहे. पाणी साठा मुबलक प्रमाणात असताना वीस दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे शहरातील बहुतांश भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे तर शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. बीड नगर पालिकेने तत्काळ या सर्व मागण्याकडे लक्ष देऊन सोडवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षातील जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या दारात संबळ आंदोलन करण्यात आले.
मुख्याधिकारी हटाव नगरपालिका बचाव, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो यास राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलनाची पूर्व सूचना देऊनही मुख्याधिकारी नीता अंधारे या नगरपालिकेत आल्या नसल्याने महिला आंदोलन चांगल्या संत आपल्या होत्या. भ्रष्ट प्रशासनाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय म्हणत अधिकारी नीता अंधारे यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिलांनी डोक्यावर मटकी ठेवत नगरपालिके प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वर्षाताई जगदाळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे शहराध्यक्ष अमरजान पठाण महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्पना कवठेकर ,आशा कुटे, नीता अडागळे, यांच्यासह महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट…
वर्षाताईंनी डोक्यावर मटके ठेवून केले आंदोलन!
शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनसे राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी डोक्यावर मटके ठेवून अनोखे आंदोलन केले आहे. तसेच मटके फोडून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या.