सोलर हायमास्ट दिवे बसवण्यात बीड शहरात मोठा भ्रष्टाचार…अक्षय कोकाटे
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याची चौकशी करून एजन्सीला काळया यादीत टाकावे.

जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून तात्काळ कारवाईची मागणी
बीड प्रतिनिधी –महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान महाअभियाने व दलितवस्ती योजनेच्या सोलर पोल हायमास्ट दिवे बसविण्याच्या योजनेत संबंधीताकडून निकृष्ठ दर्जाचे साहीत्य वापरून भष्ट्राचार केला आहे.तसेच हे हायमास्ट दिवे गार्डन, ओपन स्पेस, समशानभूमी, मंदिर व चौकामध्ये बसवण्याचे आदेश असताना देखील यात मध्ये देखील अनियमितता आहे.त्या प्रकरणी बीड नगरपालिका सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी रिपाईचे अक्षय कोकाटे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे थेट निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
बीड नगर परिषदेच्यावतीने नगरोत्थान अभियान व दलितवस्ती योजने अंतर्गत सोलार पोल हायमास्ट दिवे बीड शहरातील विविध भागामध्ये बसविण्यासाठी ५ कोटी २५ लाख रु मान्यता देण्यात आली असुन दलित वस्त्यामध्ये सोलर पोल हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १ कोटी रुपयाची मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही योजनेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने ज्या मध्ये न.प. अभियंता उदय ई पिल्ले व मा.मुख्याधिकारी न.प.बीड यांच्या मोहीनीराज – कन्ट्रक्शन व संदिप इलेक्ट्रिकल यांच्या मार्फत दलितवस्ती योजने मधून कामे करण्यात येत असून नगरोत्थान महाअभियान मार्फत साबेर कन्ट्रक्शन पाटोदा यांच्या कडून सोलर पोल हायमास्ट दिवे बसविण्याची कामे करण्यत येत आहेत. दोन्ही योजनेतील कामात बसवण्यात आलेल्या पोलची अंदाजित रक्कम व प्रत्यक्ष बसवण्यात आलेल्या पोलची रक्कम या मध्ये भष्ट्राचार झालेला असून निकृष्ट दर्जाचे साहीत्य संबंधीत एजन्सीकडून वापरून संगनमताने करोडो रुपायाचा भ्रष्टटाचार केला आहे. या प्रकरणातील अभियंता, न.प.मुख्याधिकारी व संबंधीत कामे करणाऱ्या कंट्रक्शनची निपक्षपातीपणे चौकशी करून या दोन्ही योजनेची कामे करणाऱ्या कन्ट्रक्शन संगनमताने भ्रष्टाचार करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे नोंद
करण्यात यावेत. व त्यांची एजन्सीची मान्यता रद्द करून काळया यादीत नाव टाकण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी.रिपाईचे शहर सचिव अक्षय कोकाटे, युवा शहराध्यक्ष भैय्यासाहेब मस्के,धम्मा पारवे आदीं उपस्थित होते.