देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मास्टर माइंड.
सीआयडी आरोप पत्रात वाल्मीक कराड आरोपी नंबर एक.

बीड राज्यभर गाजलेले संतोष देशमुख हत्या, खंडणी प्रकरणी न्यायालयात १००० पानाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये धक्कादायक बाबींचा उल्लेख असल्याचे वृत्त असून यात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वाल्मिक कराड़च याचा मास्टरमाईंड असल्याची चर्चा सुरू झाली असून, कराडचे पाय खोलात दिसत आहेत.केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजले. या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त करत या हत्येतील आरोपींना अटक करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते. विशेष म्हणजे या हत्या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने यात पुढे नेमके काय होणार? प्रश्न सर्वांना पडला होता परंतु काल आरोप पत्र दाखल करताना सीआयडी अधिकाऱ्याने वाल्मीक कराड हाच एक नंबरचा आरोपी असून त्याच्या सांगण्यावरूनच हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आली होती.
आठ तारखेला एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता.की खंडणी मध्ये संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.
पाच साक्षीदार
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराडविरोधात सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी,अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला असून वाल्मीक कराडच्या व अडचणीत वाढ होताना दिसत आहे.