राजू शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.
फोटो,व्हिडिओग्राफी क्षेत्रातील हिरा हरवला.

बीड शहरातील माळवेस भागातील रहिवासी राजेश रघुनाथ शिंदे यांचे हृदयाचे तीव्र झटक्याने निधन झाले.
बीड शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून फोटो व व्हिडिओग्राफी क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व बीड मध्ये पहिले ड्रोन कॅमेराने व्हिडिओ शूटिंग करणारे म्हणून त्यांची ओळख होती. राजू शिंदे यांनी नाना पाटेकर,सयाजी शिंदे, चला हवा येऊ द्या मधील जगताप यांच्यासोबत काम केले असून,अत्यंत मेहनती, मनमिळाऊ,व कष्टाळूपणाच्या जोरावर राजू शिंदे यांनी व्हिडिओ ग्राफी क्षेत्रात बीड जिल्ह्यात सर्वतोपरिचित होते. मृत्यू समयी राजू शिंदे यांचे वय ५७ वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा पत्नी असे कुटुंब आहे. राजू शिंदे यांच्यावर उद्या रविवार सकाळी ९ वाजता अमरधाम मोंढा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजू शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मित्रपरिवार,नातेवाईक, कुटुंबाला धक्का बसला असून शोककळा पसरली.