
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांत एसीबीच्या टीमने मोठ्या प्रमाणात कारवाया करत असून लाचखोराना आळा घालण्याचे काम केले आहे.
बीड एसीबी ची टीम एवढ्यावरच थांबली नाही तर जालना जिल्ह्यात जाऊन अवैध वाळू प्रकरणी एक लाख 80 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक व शिपाई एसीबच्या जाळ्यात अडकले.
अवैध वाळू उपसा केल्याने हायवा सोडण्यासह दाखल गुन्ह्यात मदत करून जामीन मिळवून देण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्वीकारताना सहायक निरीक्षकासह पोलिस शिपाई व खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने शनिवारी परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका हॉटेलमध्ये ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन माधवराव इंगेवाड (वाघाळा, नांदेड, ह.मु.आष्टी),पोलिस शिपाई गोकुळदास माणिक देवळे (जायकवाडी वसाहत,आष्टी) व खासगी व्यक्ती विष्णू बालासाहेब कुरदणे (पांडेपोखरी,ता. घनसावंगी) अशी लाचखोरांची नावे आहेत.यात एपीआय इंगेवाडयाला १ लाख तर कर्मचारी याला ५५हजार वेतन आहे. तक्रारदाराचाभाऊ व इतरांविरुद्ध आष्टी पोलिसठाण्यात गौण खनिज वाहतूकप्रकरणात गुन्हा दाखल आहे. याकारवाईत एक हायवा जप्त केला आहे.
ही कारवाई मा.संदीप आटोळे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, मा. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शंकर शिंदे, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड, पो.नि. श्री.युनुस शेख. पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम. सुदर्शन निकाळजे, राजेश नेहरकर, हनुमान गोरे, भरत गारदे, संतोष राठोड, अविनाश गवळी, चालक श्री अंबादास पुरी, चालक गणेश मेत्रे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी कारवाई केली आहे.
भ्रष्टाचाराशी संबंधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास, शासकीय, निमशासकीय अधिकारी,कर्मचारी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शंकर शिंदे यांनी केले आहे.
संपर्क..9325100100