सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील फोटो,व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीड बंद.
मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा.

संरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती.ही हत्या पवनचक्की खंडणी प्रकरणात निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त करून आरोपींना अटक करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते.
या हत्येतील मुख्य सूत्रधार,एक नंबर आरोपी वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींना मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी विरोधाकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी लावून होती. काल संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील संतप्त प्रतिक्रिया आल्या. या हत्येचा तीव्र निषेध करत आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद मध्ये सहभागी झाले. बीड शहरातील मुख्य बाजारपेठ सुभाष रोड, मोंढा,धोंडीपुरा, कारंजा रोड,नगर रोड वरील दुकान, हॉटेल्स,छोट्या व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. यावेळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,बलभीम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.