ताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यभरातील नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी लागणारे ₹500 च्या मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्याचे आदेश दिले आहेत.

सुविधेचा लाभ कोणत्या प्रमाणपत्रांसाठी लागू?

▶ जात पडताळणी प्रमाणपत्र
▶ उत्पन्नाचा दाखला
▶ रहिवासी प्रमाणपत्र
▶ नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट
▶ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
▶ शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवरही स्टॅम्प ड्यूटी माफ

लाखो नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

✅ आता या प्रमाणपत्रांसाठी एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self-Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार
✅ दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागणारा ₹3,000 ते ₹4,000 पर्यंतचा खर्च वाचणार
✅ या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत

राज्यभरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण!

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button