ताज्या घडामोडी

अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा टेम्पो वाहतूक पोलिसांनी पकडला.

वनविभागाच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या वृक्षतोड.

 

बीड जिल्ह्यामध्ये वनविभागाच्या दुर्लक्षने राजरोज, दिवसाढवळ्या वृक्षतोड व वाहतूक केली जाते.याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तोडलेली झाडे लाकडी स्वा मिलवर विकली जातात. बीड जिल्ह्यामध्ये शेकडो लाकडी मिल असून या मीलवर तोडलेली वृक्ष विक्री केली जात असल्याची माहिती मिळत असून बीड जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वा मिलवर लाकडे कुठून येतात याची वनविभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असून तपासणी करत नसल्याची तसेच जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड  वनविभागाच्या आशीर्वादानेच होत असल्याची चर्चा आहे.

 दिनांक ०५ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याचा सुमारास नगर नाका या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी सचिन क्षीरसागर व गोरे यांनी गाडी (टेम्पो) क्रमाक MH06G4846 या टेम्पो थांबून तपासणी केली असता टेम्पो ताडपत्रीने झाकली असल्याने कडून तपासणी केली असता त्यामध्ये अवैध लाकडी असल्याचे निदर्शनास आल्याने टेम्पो चालकाची वृक्षतोडीची परवानगी आहे का?,हे वृक्षतोडी कोणत्या भागातून आणली आहेत?याची चौकशी केली असता चालकाने उडवा उडवी चे उत्तर दिल्याने अधिक माहितीसाठी टेम्पो सुभाष रोडवरील जिल्हा वाहतूक शाखा बीड येथे लावण्यात आले. वाहतूक करताना टेम्पो चा चालक मालक नामे शेख मुजीब शेख जानु रा. ईस्लामपुरा, बीड हा लाकडाची वाहतुक करतांना मिळून आला, त्याच्याकडे सदर लाकडा संदर्भात परवान्याची मागणी केली असता, कोणत्याही प्रकारचा परवाना नसुन गाडीचे कोणतेही कागदपत्रे जवळ नसल्याने सदर लाकडाची गाडी वाहतुक शाखा, ऑफीस येथे लावण्यात आली आहे. सदर गाडीतील लाकडा संदर्भात पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यासाठी वनविभाग अधिकाऱ्यास माहती दिली.ही कारवाई वाहतूक पोलिस निरीक्षक सानप, पोलिस उप.नी. कुटुंबरे,पो.सचिन क्षीरसागर,पो. सिद्धार्थ गोरे यांनी केली.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button