बीड पाटबंधारे विभागातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात.
एसीबीच्या कारवायाचा धडाका.फोन पे वरून घेतली लाच.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये विविध शासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे दिले तरच कोणतेही काम वेळेवर होते, परंतु पैसे दिले नाहीत तर विविध कारणे सांगून टाळाटाळ केली जाते.
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये लाचखोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून एसीबीने देखील कारवायाचा धडाका सुरू केला आहे. बीड जिल्ह्यात सलग दोन दिवस एसीबीच्या कारवाया झाल्याने लाचखोरात खळबळ उडाली आहे.
वडवणी येथील जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बीड येथील गोदावरी पाटबंधारे विभागातील कारकून तरकसे यांनी फिर्यादी डिगे यांना 1000 रुपयाची लाच मागितली होती. लाच न देण्याची इच्छा असल्याने फिर्यादी डिगे यांनी बीड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करत पंचा समक्ष लोकसेवक मदन राजपूत यांच्या फोन पे क्रमांकावर एक हजार रुपयाचे लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहत पकडले. एसीबीच्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जायकवाडी येथील गोदावरी पाटबंधारे कार्यालयात झालेल्या कारवाईमुळे अधिकारी कर्मचाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.
एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व मुकुंद आगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असलेली गट क्रमांक 400 ढोरवाडी शिवार ता.वडवनी येथील 1 हेक्टर जमीन सखाराम डिगे यांना विक्री केली होती . डिगे यांनी सदर जमिन सिंचन लाभ क्षेत्रात येत नसल्याचे प्रमाणपत्र काढून देणे बाबत विनंती केली होती.सदरचे धारण क्षेत्र लाभ क्षेत्रात येत नाही या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी लोकसेवक तरकसे यांनी तक्रारदार यांना 1000 रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाज लचपत प्रतिबंधक कार्यालय बीड येथे करण्यात आली पंचा समक्ष याची चौकशी करत तत्काळ कारवाई करण्यात आली तर कसे यांनी लाचेची मागणी केल्यानंतर फोन पे द्वारे लाचेची रक्कम लोकसेवक मदन राजपूत यांनी स्वीकारताच दबा धरून बसलेले एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना कार्यालयात पकडले त्यांच्या आणि झडती घेतली असता दोन्ही आरोपीकडे मोबाईल व काही रक्कम मिळून आली. तर कसे यांच्या घरची झडती सुरू आहे. दोन्ही लोकसेवका विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील कारवाई एसीबी चे पोलीस उपाधीक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार , भरत गारदे ,सफौ सुरेश सांगळे , हनुमान गोरे , श्रीराम गिराम ,संतोष राठोड, अविनाश गवळी ,अमोल खरसाडे, चालक गणेश मेहेत्रे यांनी केली.
भ्रष्टाचारा संबंधित काही असल्यास टोल फ्री नंबर 1064
शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल तर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर:-9923023361 व पोलीस उप अधीक्षक लाप्रवि बीड 9355100100 यावर संपर्क साधावा असे आवाहन बीड लाचलुचपत अधीक्षक शंकर शिंदे यांनी केले आहे.