आधार व्यसनमुक्ती केंद्रामध्ये महिला दिन साजरा.

बीड शहरातील बार्शी रोडवरील आधार व्यसन मुक्ती केंद्रा मध्ये आज दि.08 मार्च रोजी जागतिक महीला दिन महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी केंद्र संचालक तेजस नाना घुमरे, डॉ. रमाताई गिरी, संतोषजी गर्जे व बाजीराव ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अनोख्या कार्यक्रमात जिल्हा रूग्णालय बीड येथील विवीध विभागाच्या प्रमुख रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. यामधे डॉ.रमाताई गिरी (नर्सिंग सुपरीटेंडेंट) शकुंतला सुतार (लेबर होम इनचार्ज) शारदा डहाळे ( नर्सेस हॉस्टेल इनचार्ज) द्वारका खाडे (सोनोग्राफी सेंटर इनचार्ज) शिला कुलकर्णी (ICU इनचार्ज) विद्या गायसमुद्रे (डायलिसीस इनचार्ज) रेखा गोतावळे (मेल सर्जिकल इनचार्ज) पुजा ठोंबरे (केंद्र परीचारीका) गौरी घुमरे यांच्या अतुलनिय कार्याबद्धल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी तेजसनाना यांनी सत्कारमुर्ती रणरागिणी, केंद्रातील सर्व कर्मचारी व रूग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्कारमुर्ती रणरागीणी या सेवाभावी वृत्तीने रूग्णासोबत कसलाही भेदभाव न करता सेवा देतात तसेच रूग्णांना शारिरीक व मानसिक दोन्ही दृष्टीने सशक्त बनवतात म्हणुन तुमच्या सेवेपुढे आजच्या जागतिक महिला दिनी नतमस्तक होतो असे म्हणाले.
यावेळी सत्कारमुर्तींनीही मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने डॉ.रमाताई गिरी या बोलताना म्हणाल्या की व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. व्यसनाधिन माणसामुळे कुटुंब उध्वस्त होते यामुळेच व्यसनापासुन दुर राहा.
या कार्यक्रमास तेजसनाना घुमरे, संतोषजी गर्जे, बाजीराव ढाकणे केंद्र अधिक्षक श्री.संजयजी भडगळे, केंद्र समुपदेशक श्री गणेश जाधव, केंद्र परीचारीका काशिद पुजा, काळजीवाहक औदुंबर भावठाणकर आदी कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश जाधव सुत्रसंचालन बाजीराव ढाकणे यांनी तर आभार प्रदर्शन संजयजी भडगळे यांनी केला.