सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्यास गुन्हे दाखल होणार…अ.पो.अधीक्षक सचिन पांडकर.
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर असणार आता पोलिसांची नजर.

बीड(प्रतिनिधी):- गेल्या काही महिन्यापासुन बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण पूर्णपणे दुषित झाले आहे. सोशल मिडीयावरून कोणीही वाटेल तशा पोस्ट करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जातीय विष पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडीया चालविणाऱ्यांना कसलेही बंधन राहीले नाही. गेल्या दोन महिन्यात जातीय विष पसरविणाऱ्या, तणाव निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या लाखो पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यांनी मात्र एस. पी. साहेब, तुमच्या यंत्रणेने किती जणांवर गुन्हे दाखल केले. कुणा-कुणाला आत टाकले ? आणि किती अशा पोस्ट डिलेट केल्या? याची माहिती जाहिर करायला हवी ? तरच अश्या वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या वर जरब बसेल.बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनीही सोशल मिडीयावर वादग्रस्त आणि दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट टाकु नये,अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.वास्तविक पाहता अशा आवाहनाने व इशाऱ्याने काहीच होणार नाही. गेल्या दोन महिन्यात सोशल मिडीयावर लाखो पोस्ट व्हायरल झाल्या. ज्या पोस्टमधुन दोन समाजात प्रचंड तेढ निर्माण होईल, कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण येईल, अशी वाक्य व्हायरल केली गेली. सध्या जिल्ह्यातील सामाजिक विषमता वाढविण्यास एकमेव सोशल मिडीयाच कारणीभुत आहे. साध्या-साध्या पोस्ट एकमेंकांच्या भावना दुखविण्यास कारणीभूत ठरू लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात हे प्रमाण प्रचंड पाहायला मिळाले. बऱ्याचदा अशा पोस्टमुळे काही ठिकाणी वाद झाले तर काही ठिकाणी एकमेंकांविरूध्दची खुन्नस वाढल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलीसांनी अशा एकाही पोस्टवर कारवाई केलेली नाही. सध्या बीड अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी वादग्रस्त,समजत तेढ निर्माण होईल अश्या पोस्ट व्हायरल करू नका, केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.