महाबोधी बौद्ध विहाराच्या निदर्शनास उपस्थित रहावे…मायाताई मिसळे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार.

बीड बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी बौद्ध विहार कायदा १९४९ रद्द करुन महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी रिपाइंकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि.१०) मार्च रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने केली जाणार आहेत. सदरील निदर्शने रिपाइंचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहेत. या निदर्शनास रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, महाबोधी बौद्ध विहारास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी /बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध’ बनले, व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. असे
असतांना तेथील बौद्ध विहाराचा ताबा हा हिंदूकडे आहे. त्यामुळे हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. यासाठी जगभरातील बौद्ध धम्मीय बिहार येथील बौधगया येथे एकत्रित आलेले आहेत. त्या अनुषंगाने देशात आणि राज्यात रिपाइं अध्यक्ष मंत्री रामदास आठवले, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शन केली जात आहेत. बीडमध्ये सोमवारी निदर्शने होवून, त्यानंतर तालुका पातळीवरही निदर्शने केली जाणार आहेत. त्यामुळे बीड येथील निदर्शनास रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं महिला जिल्हा मायाताई मिसळे यांनी केले आहे.