
बीड जिल्ह्या मध्ये मागील काही महिन्यापासून गावठी पिस्तूल बाळगणारे मोठ्या प्रमाणावर सापडत असून त्यावर कारवाई देखील होत असून ही पिस्तूल जिल्ह्यात पुरवठा कोण करत आहे याच्या मुळाशी जाणे व त्यावर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे.
आज दिनांक 10/03/2025 रोजी इसम नामे ज्ञानेश्वर संजय सानप, वय 22 वर्ष, रा.वडझरी ता. पाटोदा जिल्हा बीड हल्ली मुक्काम जुना चऱ्हाटा रोड बीड हा स्वतःकडे एक गावठी पिस्टल कंबरेला लावून फिरत असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडून एक गावठी पिस्टल जप्त करून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.न. 133/2025 कलम 3/25 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक उस्मान शेख, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, दीपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप,नारायण कोरडे, विकी सुरवसे यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोणी अवैध शस्त्र वापरत असेल किंवा साठा केला असेल तर याची माहिती पोलिसांनी द्यावी असे त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.