ताज्या घडामोडी
हृदयाच्या तीव्र झटक्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू.
पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर वॉकिंग करत असताना मृत्यू.

नगर रोड वरील पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंडवर वॉकिंग करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
राजू वखरे सध्या नेमणूक पोलीस मुख्यालयात होते. पूर्वी पोलीस वाहन चालक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणेच पत्नीसोबत पोलीस मुख्यालय येथे वॉकिंग करत असताना आज सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले.वखरे यांचा मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटक्याने आल्याने डॉक्टरांनी सांगितले. पोलीस वाहन चालक असल्याने वखरे हे सर्वतो परिचित होते. त्यांच्या अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर, नातेवाईकावर व मित्र परिवाराना धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.