आ.संदीप क्षीरसागरानी तहसीलदारांना धमकावले?

दोन दिवसांपूर्वीच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी एका शोरूम मध्ये सेल्स मॅनेजरला मारताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यावर ते कार्यकर्ते माझे नाहीत असे स्पष्टीकरण संदीप क्षीरसागर यांनी मीडियाला दिले.
त्यातच आता आमदार संदीप क्षीरसागर यांचीही एक जुनी ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. यात, तत्कालीन तहसीलदार डोके यांना ते फोनवरून एका ग्रामरोजगार सेवकाला नोटीस का दिली, असा जाब विचारत आहेत.मला न विचारता माझ्या मतदार संघाचा पदभार का घेतला ?राज्यात कुठेही असाल तरी पाहून घेतो, अशी धमकीही देत आहेत. २०२३ मधील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. तहसीलदारांना धमकवणे आमदाराने कितपत योग्य आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सदरील ऑडिओ क्लिप, मोबाईल वरील संभाषण आमदार संदीप क्षीरसागर यांची आहे का?यांची पुष्टी केली जाणार आहे.