ताज्या घडामोडी

दादा खिंडकर टोळीची दादागिरी पहा .

जिल्ह्यातील नेत्यांच्या कार्यकर्त्याचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ.

 

https://youtube.com/shorts/RJkG_GpetYY?si=l3xxVuEct6svLqbp

 

बीड (प्रतिनिधी):-बीड बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्याचे,नेत्यांची व कार्यकर्त्यांचे मागील काही वर्षातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून दोन दिवसापूर्वी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता बीड तालुक्यातील बाबुळवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये वाद झाल्याने दादा खिंडकर याने ओंकार सातपुते यास उचलून शेतात नेऊन त्याला बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.यामुळे ओंकार सातपुतेने या तरुणाने दादा खिंडकरसह इतरावर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

बीड तालुक्यातील बाभळवाडी येथे जानेवारी २०२४ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली.त्यावेळी निवडणुकीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला होता. सातपुते यांनी खिंडकर च्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने दादा खिंडकर यांनी सातपुतेला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दादा खिंडकरच्या त्याच्या सोबत इतरही चार ते पाच जण ग्रुप करुन सातपुतेला मारहाण करताना दिसत आहे.ही घटना जुनी असली तरी गुन्हा कधीही दाखल होऊ शकतो या व्हिडीओच्या माध्यमातून त्याची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून खिंडकर हा मस्साजोग येथील सरंपच स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू आहे.

जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचे मारहाणीचे जुने व्हिडिओ व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली असून आणखी बरेच मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होणार असल्याची चर्चा बीड जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button