मंडळ अधिकारी शितल चाटे रयत सामाजिक प्रतिष्ठान कडून सन्मानित.
रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न.

बीड( प्रतिनिधी)बीड तालुक्यातील पाली महसूल विभागाच्या कर्तव्यदक्ष मंडळ निरीक्षक, शितल चाटे यांना महाराष्ट्र राज्य रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान अविनाश पाठक बीडचे जिल्हाधिकारी , शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी, कविता जाधव उपविभागीय अधिकारी आणि चंद्रकांत शेळके तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पाली मंडळा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याची निवड करण्यात आली होती. त्यानिमित्त शितल चाटे याना सन्मानित करण्यात आले आहे.शितल चाटे यांनी आपल्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील पाली महसूल विभागामध्ये, त्यांच्या कर्तव्यावर अगदी प्रामाणिकपणे कार्यरत राहून जनतेच्या अडचणींच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी पावसामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून तसेच शासनाच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहिले आहेत.
गोरगरीब शेतकऱ्यांना पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन काम केले आहे. त्यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे सु परिचित आहेत, जेथे त्यांनी मोठ्या जबाबदारीसह काम केले आहे.
शितल चाटे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीद्वारे न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वीपणे काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आर.जी. माने यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांच्या पुढील प्रशासकीय कर्तव्यांसाठी मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या.
शितल चाटे यांचा हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे व कौशल्याचे प्रतिक आहे आणि त्यांनी केलेली मदत अनेकांना न्याय मिळवून देण्यात सफल ठरली आहे.