देशमुख हत्या प्रकरण लक्ष विचलित करण्यासाठीच जुने व्हिडीओ व्हायरल..मनोज जरांगे
देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेना सह आरोपी करा.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणांने बीड जिल्हासह महाराष्ट्र हादरला असून गेल्या आठवड्यात देशमुख यांना मारहाण व हत्या करताना चे फोटो प्रसार माध्यमावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील प्रत्येकाने हळहळ व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने मागील काही दिवसांमध्ये आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश दादा सोळुंके,आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचे व्हिडिओ, ऑडिओ व्हायरल केले जात असल्याने आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
धनंजय मुंडेवर काही गंभीर आरोप करत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लक्ष विचलित करण्यासाठीच धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कामाला लागले असून आमदाराची जुनी मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केली जात असल्याचा दावा मनोज जरांगेंनी यांनी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कृष्णा आंधळे हा तीन महिन्यापासून सापडत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आरोपीला पकडण्यात भेदभाव केला जात आहे या सरकारची भ्रष्टाचाऱ्या सोबत भागीदारी आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचा व्हायरल व्हिडिओ बद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मला वाटतं परवापासून यांनी तुमची आणि त्यांची आमची प्रकरण काढायची ठरवली आहेत मुळात म्हणजे देशमुख प्रकरणाचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे भांडण प्रत्येकाचे झाले आहेत मी महाराणी समाजात करत नाही असंही मनोज रंगे यांनी म्हटले आहे.
देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना 302 दाखल करून सह आरोपी करावे अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे.2,3 वर्षाचे प्रकरण, व्हिडिओ बाहेरी काढली जात आहेत. देशमुख प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा काम केलं तर यापेक्षा वाईट कोणी नाही असा देखील इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. देशमुख हत्या प्रकरण अधिवेशनात लावून धरल्यानेच यांच्या कार्यकर्त्याची व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. परंतु जुनी प्रकरण, व्हिडिओ व्हायरल केल्याने देशमुख हत्या प्रकरणातील आमचे लक्ष विचलित होणार नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांना या हत्या प्रकरणात सहा आरोपी करावी अशी मागणी केली आहे.