ब्रेकिंग न्यूज

दुकानासमोरील टायरची चोरी करणारी टोळी जेरबंद.

सहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त, बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

 

बीड ग्रामीण हद्दीत दुकानासमोर लावलेले टायरची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने उघड करुन दोन आरोपी केले जेरबंद करुन 65000/- रु चा मुद्देमाल केला जप्त.

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून दिवसेंदिवस मारामाऱ्या,हत्या घडत असल्याने बीड जिल्ह्याची चर्चा राज्यभर होत आहे. दि.15/3/2025 रोजी 0600 ते दि.16/3/2025 रोजीचे 0930 वा. पुर्वी बीड बायपास रोड लगत शिदोड शिवार ता.जि.बीड येथे फिर्यादी गणेश महादेव गायकवाड व्यवसाय गुत्तेदारी, रा. सुभाष कॉलनी पेठ बीड यांचे गॅरेज लाईन चे गाळया समोर उभे असलेल्या आमचे टाटा कंपनीचे दहा टायरी वाहनाचे आठ टायर्स 96,000/- व आठ डिक्स 24000/- तसेच अखील खान यांचे त्या परिसरात असलेले दुकानासमोर ठेवलेले वेगवेगळया कंपनीचे 07 टायर 14000/- रु असे दोन ठिकाणांवरील एकुण 1,34,000/- रु चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला म्हणुन दिनांक 17/03/2025 रोजी पो.स्टे. बीड ग्रामीण गुरनं 79/2025 क.303(02) भादंवि प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. 

             सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख यांनी अधिपत्याखालील पोउपनि श्री. महेश विघ्ने यांचे पथकास आरोपी शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते. पोउपनि महेश विघ्ने यांनी आपल्या पथकातील अंमलदारसह आरोपीची गोपनिय माहिती काढण्यास सुरुवात केली.दिनांक 04/05/2025 रोजी आरोपी शोध घेत असतांना गोपनिय माहिती द्वारे कळाले की इसम नामे पापा उर्फ रामेश्वर राजेंद्र शिंदे याने व त्याचे इतर साथीदाराने मिळुन सदर गुन्हा केला आहे. त्यानंतर पथकाने सदर इसमास इंद्रापेढी येथुन ताब्यात घेवुन गुन्हया अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार रवी सुंदुर काळे रा.जोगेश्वरी पारधी पेढी,पारा, ता.वाशी,जि.बीड व इतर साथीदारांसह केला असल्याचे कबुली दिली असुन गुन्हयातील गेलामाल पैकी 64,000/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

  दोन्ही आरोपीतांना पो.स्टे.बीड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन इतर चार आरोपींचा शोध घेवुन अटक करण्याचे प्रयत्न चालु आहे. पुढील तपास पो.स्टे.बीड ग्रामीण हे करीत आहेत. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अपोअ बीड, पो.नि.उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, पोह/ महेश जोगदंड, पोह/राजु पठाण, पोह/तुषार गायकवाड, पोअं/बप्पासाहेब घोडके, चालक पोह/गणेश मराडे स्था.गु.शा.बीड यांनी मिळुन केली आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button