
बीड सायबर मधील अधिकारी पीएसआय रंजीत कासले यांनी बाहेर राज्यात जाऊन मोठी डील केल्याचा आरोप असल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.
पीएसआय रंजीत कासले यांचे निलंबन झाल्यापासून फरार होते मात्र सोशल मीडियावर त्यांनी राजकारण्यासह बीड पोलीसावर देखील आरोप केले होते.त्यामुळे त्यांची चर्चा झाली होती.
परळी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्तव्यावर असताना धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांनी पैशाची वाहने सोडण्यास सांगितले होते. तसेच आमदार धनंजय मुंडे व वाल्मीक कराड वर आरोप करत त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे करण्यास व निवडणुकीच्या काळामध्ये कर्तव्यावर असताना धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड यांनी दहा लाख रुपये अकाउंट वर टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.
बीड पोलिस अधीक्षक यांच्यावर देखील आरोप करत मला पकडून दाखवा असे बीड पोलिसांनी चॅलेंज केले होते. रोज नवनवीन व्हिडिओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याने रणजीत कासले हे अधिक चर्चेत आले होते. कासले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप करत व्हिडिओ व्हायरल केले होते.psi कासले फरार असताना बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर अंबाजोगाई मध्ये देखील कासलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आज न्यायालयाने रणजीत कासले यांचा ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून जामीन मंजूर करण्यात आला.परंतु कासले यांच्यावर आंबेजोगाई पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आसल्याने पोलिस अधिक तपासासाठी ताब्यात घेणार की जामीन झाल्यामुळे सुटणार आहेत का नाही या बाबद माहिती उद्या समजणार आहे.