ब्रेकिंग न्यूज
रात्रीतून उभारला धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा.
संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुतळा उभारला.

सोलापूर धुळे महामार्गावरील महालक्ष्मी चौकामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी रात्रीतून चौकात बसवण्यात आला.यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन फटाक्याची आतिषबाजी करत घोषणा दिल्या.
छत्रपती संभाजी राजे यांची आज जयंती असल्याने सोलापूर धुळे महामार्ग वरील बीड शहरात प्रवेश करणाऱ्या महालक्ष्मी चौकात शिवप्रेमींनी रात्रीतून पुतळा बसवण्यात आला.बीड शहराला जोडणारा व शहरातून बाहेर जाण्यासाठी,संभाजी नगरला जाण्यासाठी हा मुख्य चौक असल्याने या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला.याची माहिती बीड पोलीस प्रशासनाला मिळतात.महालक्ष्मी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात आला.यामुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण असून पुतळा पाहण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी जालना रोडवरील संभाजी महाराज चौकात येत आहेत.