ब्रेकिंग न्यूज

नशेसाठी औषध,गोळ्या विकणाऱ्या रॅकेटवर छापा,चौघे पोलिसांच्या ताब्यात.

औषध गोळ्याच्या साठा जप्त,बीड शहर पोलिसांची कारवाई.

   बीड शहर पोलिसांनी मागील काही महिन्यापूर्वी शहरांमध्ये नशेच्या गोळ्या आणि औषध विकणारे रॅकेट पकडले होते,त्यानंतर हा उद्योग बंद पडला होता. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नवीन लोकांनी या धंद्यात डोकेवर काढल्याचे दिसत आहे. अल्पवयीन व तरुण मुले नशाच्या गोळ्या व औषध असा सेवन केल्याने अनेक गुन्हे घडत आहेत. 

 शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीत माहिती नशेची औषध व गोळ्याचा साठा एका घरात असून तो विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली रात्री बीड शहर पोलिसांना मिळाली असता. यावरून दिनांक १६ मे रोजी रात्री अकरा वाजता जुना बाजार येथील हाफिस गल्ली येथे फैजान अस्लम खान पठाण याच्या राहते घरी छापा मारला असता तेथे उपचारासाठी असलेजे औषध गोळ्या याचा मोठा साठा मिळून आला. हीच औषधे नशे करण्यासाठी लोकांना विकत असल्याची खात्री पटली होती. त्यासोबत खालील आरोपी तेथे मिळून आले.फैजान खान असलम खान पठाण राहणार हाफिस गल्ली, सोहेल खान युसुफ खान पठाण राहणार, हाफिस गल्ली, शोएब खान ताजुद्दीन खान राहणार हत्तीखाना,शेख फिरोज शेख सादेख राहणार गिराम गल्ली कारंजा यांना मुद्देमाला सह रंगीहात पकडले आहे. त्यांच्याकडून दोन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

    मागील काही दिवसात शहरांमध्ये अशाप्रकारे अतिशय काटेकोर गुप्तता पाळून नशेचे औषध आणि गोळ्या चोरून लपून विक्री चालू होती. यामध्ये बऱ्याचदा लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचे नशेची औषध गोळ्या पुरवल्या जातात. यातून गुन्हेगारीची वाढ होत आहे असे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अशा प्रकारचे रॅकेट शोधून काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातून कालचा हा छापा मारून कारवाई करण्यात आली आहे. 

    सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ,पोलीस अंमलदार सचिन अलगट,जयसिंग वायकर,सुशेन पवार,मीरा रेडेकर, मनोज परजणे, अश्फाक सय्यद, सखाराम माने यांनी केली आहे .बीड शहरातील पेठ बीड भागात मोठ्या प्रमाणात नशेची, औषधं गोळ्या विक्री होत असून बीड शहरात साठा कोण पुरवतो याच्या मुळाशी जाणे व त्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. नशेच्या गोळ्या,औषधाचा साठा जप्त केल्याने बीड शहर पोलीस स्टेशनचे नागरिकाकडून कौतुक होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button