धावत्या कंटेनरला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक.
गेवराई बीड रस्त्यावरील रांजणी गावाजवळ घटना.

सोलापूर धुळे महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी टोलनाक्याजवळ छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे चपला नेणारा कंटेनर गेवराई तालुक्यातील रांजणीजवळ अचानक पेटला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही का ठप्प झाली होती, परंतु पर्यायी सर्विस रोड चा रस्ता असल्याने वाहतूक सुरळीत झाली.आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली असता कर्मचाऱ्याकडून आग शमविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
कंटेनला लागलेल्या आगीत चपलाचा माल जळून खाक झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.आग शमविण्यासाठी गेवराई शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.आग लागल्याने एका बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे कारण समजू शकलेले नाही. या आगे मध्ये जीवित हानी झाली नसली तरीही कंटेनरचे व वाहनांमधील साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.