मनोज जरांगे यांनी घेतली शिवराज दिवटेची भेट.
"आता भेटायचं नाही भिडायच"जरांगे पाटील.बीड बंदची हाक.

चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला, म्हणाले – ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार.
परळी तालुक्यातील शिवराज दिवटे या तरुणाला दहा पंधरा माथे फिरून रिंगन करून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाल्याने जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मारहाण झाल्याची माहिती समजतात आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी शिवराज दिवटे याची भेट घेतली. अंबाजोगाई येथील जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन त्यांनी शिवराज दिवटेच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्याच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवराज दिवटेच्या शरीरावरील मारहाणीचे वळ देखील असून हाथ फ्रॅक्चर झाला आहे. ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी घेतला.
दोन दिवसांपूर्वी परळीतील अमानूष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला होता. यात शिवराज टिवटे यास बेदम मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवराज दिवटेवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रुग्णालयात शिवराज दिवटे याच्याशी भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आपुलकीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला,त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंबेजोगाई येथील रुग्णालया बाहेर सकल मराठा समाजाच्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
*बीड बंदची हाक*
शिवराज दिवटे या तरुणास बेदम मारहाण केल्याने या घटनेचा निषेध करण्यात आला गुंडगिरी भाईगिरी लहान व अल्पवयीन तरुणात भिनली असून शिवराज दिवटेला मारहाण करणारा टोळीचा मोहरक्या समाधान मुंडे असून त्याची आणखी एक ऑडिओ व आणखी एकास मारहाण करतानाचा व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे.त्यामुळे उद्या दिनांक १९ मे रोजी बीड बंदची हाक सकल मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.