ब्रेकिंग न्यूज

गुटख्याच्या गोडाऊनवर छापा.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा.बीड यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंद्ये करणारांची गोपनिय माहिती काढुन कारवाई करण्यासाठी स्थागुशा पथकांना सुचना दिलेल्या आहेत. 

त्यावरुन दिनांक 06/06/2025 रोजी स्थागुशा बीड येथील पोउपनि महेश विघ्ने हे वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे वडवणी हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमी मिळाली की, ईसम नामे अरविंद सुग्रिव म्हस्के हा त्याने किरायाने घेतलेल्या आनंद किराणा स्टोअर्स दुकानात मोठया प्रमाणात अवैद्यरित्या गुटख्याची साठवणुक करुन ठेवला आहे. यावरुन सदर ठिकाणी दोन पंचाना पाचारण करुन पोलीस स्टाफसह पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांचे टीम ने वसंतराव चौकातील आनंद किराणा स्टोअर्स् वर अचानक छापा टाकला असता ईसम नामे अरविंद सुग्रिव म्हस्के हा दुकानात हजर मिळुन आला. त्याचे दुकानाच्या झडतीमध्ये त्याने स्वत:चे फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत स्वादिष्ठ पान मसाला, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ वर बंदी असतांना देखील विनापरवाना, बेकायदेशीररित्या दुकानामध्ये गुटखा, पान मसाला, तंबाखु जन्य पदार्थाचा एकुण 4,49,300/- रु चा मुद्देमाल बाळगतांना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस पोलीस स्टेशन वडवणी येथे हजर करुन त्याचे विरुध्द पोउपनि महेश विघ्ने स्थागुशा,बीड यांनी सरकार तर्फे फिर्याद देवुन गु.र.नं 155/2025 भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274,275 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. 

ही कामगिरी नवनित कॉंवत पोलीस अधीक्षक,बीड , सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड,पो.नि. शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने , पोह/ राजु पठाण, महेश जोगदंड,राहुल शिंदे, पो अं /बप्पासाहेब घोडके,अर्जुन यादव, चालक गणेश माराडे यांनी मिळुन केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button