
पेड बीड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे तसेच गुंडगिरीच्या प्रमाणात वाढ झाली असून अवैध धंदे, गुंडगिरी करणाऱ्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत असून काहीना हद्दपार करण्यात आले आहे.
पेठ बीड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी भागात एक इसम दोन धारधार तलवारी घेऊन दहशद माजवत फिरत असल्याची माहिती मिळालीअसता.त्या ठिकाणी जाऊन तलवारी घेऊन फिरणाऱ्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव -नितीन मधुकर धुनघव वय 34 वर्षे रा.पिंपळगाव ता.केज जि.बीड ह.मु.एम.आय.डी.पेठ बीड हा दोन धारदार तलवारीसह मिळून आल्याने त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतल्यात आले.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत ,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि नित्यानंद उबाळे सोबत पो ह 1353/सुभाष मोटे, पो ह 1065/नितीश माने, पो अं 2218/विष्णु गुजर, पो अं 367/शरद पोकळे यांनी केली.पेठ बीड पोलिस पो.अं 2218/विष्णु गुजर यांच्या फिर्यादीवरून तलवार बाळू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.