ब्रेकिंग न्यूज

पाणी पुरवठा मधील कार्यकारी अभियंता,लिपीक एसीबीच्या जाळ्यात.

८० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून,जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयामध्ये लाच दिल्या शिवाय कामच होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या कारवाईमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेले लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात लाचखोरी सुरू असल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडलेले आहेत सध्या बीड जिल्ह्यात जल जीवन मिशनची जवळपास हजारो कामे सुरू आहेत या कामाच्या टेंडर प्रक्रियेपासून ते फायनल बिल काढण्यापर्यंत विद्यमान कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे असो की यापूर्वीचे गेल्या तीन वर्षातील कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता एवढेच काय पण टेंडर क्लर्क पासून ते शिपायापर्यंत अनेक जण पैसे घेतल्याशिवाय सहीच करत नव्हते अशी या विभागाची चर्चा होती

दरम्यान कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांनी 80 हजार रुपयांची लाच घेताना लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.मुकुंद आंधळे यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गुत्तेदारांचे बिल काढण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी व खाजगी इसमा द्वारे टक्केवारी गोळा करत होते अशी चर्चा मागील काही महिन्यापासून होती. 

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी आंधळे यांच्या घराची व मालमत्तेची चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयांची माया असण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील मागील काही दिवसांमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे.या कारवाईमुळे नाच खोराचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली.

सदरची कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर,मुकुंद अघाव, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, अमोल खरसाडे संतोष राठोड, प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी.सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button