चिठ्ठीत सावकारांची नावे लिहून जीवन संपवले.
बीड शहरातील दुर्दैवी घटना.अवैध सावकारावर कारवाई कधी?

बीड शहरात अवैध सावकारकीच जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे चित्र सध्या बीड शहरात पहावयास मिळत आहे.सावकार व्याजाने पैसे देऊन अव्वा च्या सव्वा रक्कम वसूल केली जाते.काही सावकार तर रोजाने, तासावर, फेडीवर तर काही महिनेवारी परतफेडीवर पैसे देतात.वेळेवर व्याज नाही दिले तर व्याजावर परत व्याज लावून रक्कम वसुली करत शिवीगाळ व धमकी देखील दिली जाते.
बीड शहरातील शनिवार पेठ, काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी रामा दिलीपराव फटाले वय ४२ वर्ष यांनी कपडा व्यावसासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते,पैसे वेळेवर न दिल्याने सावकारानी त्रास दिल्याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवले.ही घटना आज दिनांक ६ जुलै रविवार रोजी घडली.
रामा फाटले हे कपडा व्यवसाय करत होते,जिल्ह्यातील आठवडी बाजारात मध्ये जाऊन कपडे विक्री करत होते.कपडा व्यवसायासाठी त्यांनी बीड मधील काही सावकाराकडून पैसे होते.त्या सावकारांना वेळेवर व्याज देऊन देखील शिवीगाळ व त्रास दिल्याने फाटले यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
रामा फटाले यांनी काही पत संस्थाकडून कपडा व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.परंतु सावकाराने पैसे देताना चेक घेतले होते.व्याजाच्या पैश्याची परतफेड करून देखील सावकार चेक परत न देता उलट व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने व्याजावर व्याज द्यावे अशी मागणी करत शिवीगाळ केल्याने आज राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
सावकारांना कंटाळून याआधी देखील बऱ्याच लोकांनी जीवन संपवले असून पोलिस प्रशासनाने आता तरी अवैध सावकारावरं कारवाई करण्याची गरज आहे.