जबरी चोरी,लुटमार करण्यासह मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात.
२४ तासाच्या आत मोटरसायकल चोर पकडला.बीड शहर पोलिस(DB)पथकाची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोटरसायकल चोरी आणि इतर चोऱ्यावर नियंत्रण करण्यासाठी सर्व ठाणेदार यांना सूचना दिल्या आहेत.
बीड सरकारी दवाखाना येथील रुग्णालयासमोरून डॉक्टर दिनेश भगवान तुपे, आशापुरा अपार्टमेंट बीड यांची अवेंजर मोटरसायकल सरकारी रुग्णालय बीड येथून चोरी गेली होती. परंतु बीड शहर डीबी पथकाने यात चांगली कामगिरी करून यातील मोटरसायकल चोर पुन्हा एकदा सापळा लावून काही तासातच पकडला आहे. ज्या ठिकाणाहून गाडी चोरी गेली होती त्याच ठिकाणी डीबी पथकाने सापळा लावला होता आणि हाच चोर तेथे गाडी चोरी करण्यासाठी काल दिनांक 4 ऑगस्ट 2025 दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथे आला आणि पोलिसांच्या सापळ्यात गाडी चोरी करत असताना अलगत अटकला. त्यास जागीच पकडण्यात आले आहे आणि त्याने काल चोरी करण्यात आलेली गाडी याची सुद्धा कबुली दिली आणि हॉटेल स्वराज समोर लावलेली डॉक्टर दिनेश तुपे यांची अवेंजर गाडी पोलिसांनी जाऊन ताब्यात घेतली आहे.
अभिलेखावरील गुन्हेगार वैभव संजय वराट राहणार आयटीआय कॉलनी बीड याने दिनांक 2 .8 .25 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बंजारा हॉटेल समोर भैय्यासाहेब नागनाथ सोनकांबळे राहणार सम्राट चौक बीड. याचा मोबाईल आणि बाराशे रुपये नदी असे पैसे असे जबरीने काढून घेतले. परंतु बीड शहर च्या डीबी पथकाने चांगली कामगिरी करत प्रमुख आरोपी वैभव वराट याला तात्काळ अटक केली आहे त्याच्याकडून 1200 रुपये जप्त देखील केले आहेत. वैभव वराट याद दोन दिवस पीसीआर ची मागणी करण्यात आली आहे. यातील एक आणखी आरोपी अटक करणे बाकी आहे.
या दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, साहेब पोलीस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार संजय राठोड, शहेंशा सय्यद,संदीप आघाव, अमर घुगे, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशील उगले,यांनी केली आहे. दोन्ही कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.