बीड शहरातून दिवसा ढवळ्या चारचाकी थार गाडी चोरली !
चोरटे थार गाडी पळवताना सीसीटीव्हीत कैद.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील मध्यवर्ती भागातून दिवसा ढवळ्या एक चारचाकी(थार)गाडी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.गाडी चोरून घेऊन जात असतानाचा चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून यांची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दिनांक २/०८/२०२५ रोजी सांयकाळी ५ वाजता दिपक तेलंग हे महिंद्रा कंपनीची,काळ्या थार गाडी क्रमांक MH23BH 7575 नगर नाका येथील जिम जवळ पार्क करून जिम मध्ये गेले असता, जिम मधून परतून आल्यावर थार गाडी बाहेर दिसून न आल्याने दीपक तेलंग यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरट्यांनी गाडी चोरून नेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. दिवसा ढवळ्या गाडी चोरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून थार गाडी ही नगर रोड वरून बार्शी रोडवर घेऊन जात असताना सीसीटीव्ही दिसत असून चोरीला गेलेल्या थार गाडीचा पोलीस शोध घेत आहेत.
तरी कोणाला थार गाडी दिसल्यास आढळून आल्यास किंवा माहिती असल्यास दिपक तेलंग मो.क्र. 8668569182 कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.