महादेव मुंडे यांच्या हत्येविषयी माहिती देणाऱ्यास बक्षीस !
एसआयटी प्रमुख IPS पंकज कुमावतांचे थेट नागरिकांना आवाहन.

बीड(प्रतिनिधी)परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची २१ महिन्यापूर्वी परळी शहरात हत्या करण्यात आली होती.या हत्येतील आरोपीचा शोध अद्यापही पोलिसांना लागला नसल्याने महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसआयटीने तपास करावा तपास करावा व एसआयटी प्रमुख म्हणून पंकज कुमावत यांच्याकडे तपास द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एस.आय.टी.प्रमुख पंकज कुमावत यांनी महादेव मुंडे यांच्या हत्ये बाबद कोणाला काही माहिती असेल तर आम्हला द्यावी असे थेट आवाहन पंकज कुमावत यांनी नागरिकांना केलं आहे.
पंकज कुमावत यांनी केली घटनास्थळाची पाहणी.
एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी सोमवारी परळी येथे भेट देऊन महादेव मुंडे यांचा खून झालेल्या तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत एस.आय.टी. मधील सदस्य आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पथक रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळीच होते. यावेळी कुमावत यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, आता यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी २१ महिन्यापासून मोकाटच आहेत. या अनुषंगाने या प्रकरणाच्या तपासाला वेग आले आहे. त्यातच आता या खून प्रकरणाची कुठलीही माहिती सदर गुन्हयातील आरोपीतांचा अद्याप शोध न लागल्याने IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्यात आली असून. SIT पथकाने पुढील तपास सुरु केलेला आहे. स्वर्गीय महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्ये बाबत काही माहिती असल्यास अथवा त्या बाबतची माहिती देणे असल्यास. IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांना त्यांचा वैयक्तिक मो. ९९९०७८२४३१ वर माहिती देवु शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपणीय ठेवण्यात येईल. माहिती देणाऱ्याचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड केले जाणार नाही. तसेच माहिती देणाऱ्यास उचित बक्षीस देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.