तब्बल सात वर्षांनीं झाली आई,वडील व मुलाची भेट !
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घडवून आणली भेट.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस स्टेशन पिंपळनेर CR No. 164/2023 कलम 363 IPC या गुन्ह्यातील पीडित मुलगा नामे राजू काकासाहेब माळी, वय 16 वर्ष (सन 2017 मधील वय) रा.खळवट लिमगांव ता.वडवणी जि.बीड हा सन 2017 पासून हरवलेला होता. सदर मुलाचा पोलीस स्टेशन पिंपळनेर व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग, बीड यांनी वारंवार शोध घेऊन देखील तो मिळून येत नव्हता. सदर मुलगा हा जिवंत आहे किंवा नाही ? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.परंतु बीड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपास करून आई वडील व मुलाची भेट घडवून आणली.
सदर मुलास शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व पोह / असिफ शेख यांनी तांत्रिक विश्लेषण करून सदर मुलाचा शोध घेतला असता त्याबाबतची उपयुक्त माहिती मिळवून आली. सदर मुलास पुणे येथून ताब्यात घेतला आहे.
सदरची कामगिरी नवनीत कॉवत बीड पोलीस अधीक्षक,सचिन पांडकर अपर पोलिस अधिक्षक,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा यांनच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोह/असिफ शेख, आनंद मस्के, विक्की सुरवसे, अर्जुन यादव, सिद्धेश्वर मांजरे यांनी केलेली आहे.असून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तब्बल सात वर्षांनी आई वडील मुलाची भेट घडवल्याने आनंद व्यक्त करत, मुलाच्या गळ्याला पडून धाय मोकळुन रडू लागले माळी कुटुंबीयांचा आनंदाचा क्षण पाहून पोलीस अधिकाऱ्यांचे देखील डोळे पाणावले.माळी कुटुंबीयांनी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.