परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे अस्तित्व धोक्यात !
पोलीस अधीक्षक साहेब यांनी संरक्षण द्यावे :- सय्यद सलीम बापू

बीड(प्रतिनिधी)परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे अस्तित्व धोक्यात असून पोलीस अधीक्षक साहेब यांनी ऐतिहासिक देवस्थान दर्गा नासर जंगला संरक्षण द्यावे अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केली आहे.
परळी येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत येणारी ऐतिहासिक देवस्थान नासर जंग दर्गा असून सदरील दर्गेला खिदमत माश एकूण 178 एकर इनामी जमीन आहे.गेल्या काही वर्षांपासून सदरील देवस्थान मिळकतीवर येथील स्थानिक भूमाफिया यांचा डोळा असून ते सतत देवस्थान इनामी जमीन लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. ऐतिहासिक दर्गा नासर जंगच्या मिळकतीवर अतिक्रमण करून टोले जंग इमारती बांधली जात असून सदरील मिळकतीच्या बोगस फेरफार करून पी.टी.आर व पी.आर कार्ड सुद्धा देण्यात आले आहे.तरी या प्रकरणी आंबेडकरी विचार मोर्चा संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन प्रकरण उघडगीस आणण्याचे काम केले आहे.
काल येथील भूमाफिया यांनी परळी नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे ऐतिहासिक व पुरातत्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केले.याप्रकरणी मी स्वतः परळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना कॉल करून सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ऐतिहासिक पुरावे का नष्ट केली जात आहे ? असे प्रश्न विचारले असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली.व त्यानंतर मी वक्फ मंडळाचे मुख्य अधिकारी यांना कॉल करून सदरील प्रकरणाची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ जिल्हा वक्फ अधिकारी यांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती दिली.
तरी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाअंतर्गत येणाऱ्या ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे ऐतिहासिक व परतत्व पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न हे अत्यंत गंभीर असून हे सर्व प्रकार परळी येथे भूमाफिया,तलाठी,मंडळ,अधिकारी,तालुका निबंध आणि परळी नगर परिषद येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने होत आहे.या प्रकरणी पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन वरील प्रकरणात ऐतिहासिक देवस्थान नासर जंगला संरक्षण द्यावे अशी मागणी करत लवकरच परळी पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे कायदेशीर तक्रार करणार अशा आशियाचे निवेदन आंबेडकरी विचार मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी एड.सय्यद अल्ताफ, सय्यद इलियास भाई व समीर सिद्धीकी सह आदी उपस्थित होते.