
बीड(प्रतिनिधी) बीड सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बीड बायपास संभाजी राजे चौक जवळील शेतामध्ये एक तरुण आज सकाळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, याची माहिती तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोराळे सह पोलिस दाखल झाले.
तरुण हा पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असल्याचा प्राथमिक अंदाज येत असून त्याचे पाय दोरीने बांधले असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करत आहेत.त्या तरुणाचे नाव गणेश सतीश बहिरवाळ रा मंझरी वय २२ वर्ष सध्या मुक्काम धानोरा येथे शेती करत असल्याची माहिती मिळत आहे.
ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून याचा सखोल तपास करावा अशी मागणी बहिरवाळ कुटुंब व नातेवाईक करत आहेत.सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देण्यात येईल.