व्यापाऱ्याचे स्कुटीच्या डिग्गीतून चोरटे पैसे कसे चोरतात व्हिडिओ पहा !
२० दिवस झाले तरी बीड पोलिसांना चोरांचा शोध लागेना,डिग्गीतून पैसे चोरणारी गँग सक्रिय.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात मागील काही महिन्यात दुचाकीच्या डीग्गीतून पैसे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
बार्शी नाका भागात अमोल मुसळे यांनी HDFC बँकेतून चार लाख रुपये काढून स्कुटीत दीड लाख रुपये ठेवले होते,काही पाळत ठेवून तीन मोटरसायकलवर पाठलाग केल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत होते.मुसळे बार्शी नाका चौकात जुस पिण्यासाठी थांबले असता चोरट्यांनी स्कुटीचे लॉक तोडून रक्कम चोरली.
दिनांक २१ जुलै रोजी बीड येथील व्यापारी सुरज विजयबहादुर पाल वय 44 वर्ष व्यवसाय रामप्रसाद गृह उद्योग रा.सिद्धेश्वर नगर, बहिरवाडी बीड यांचे मोढ्यातुन चोरट्यांनी रक्कम लंपास केल्याची घटना घडली.
सूरज पाल यांचे एम.आय.डी.सी. बीड येथे रामप्रसाद गृह उद्योग चालवत असुन त्या ठिकाणी राजगिरा लाडु बनविण्याचा व्यवसाय करुन राजगिरा लाडु बीड शहरामध्ये डीलीवर करण्याचे काम करतो व उधारीवर दिलेल्या मालाचे पैसे नंतर गोळा करण्याचे काम करतात.
दि. 21/07/2025 रोजी मी नेहमीप्रमाणे पेठ बीड हद्दीमध्ये मोंढा भागात दिलेल्या मालाचे पैसे माझ्या टीव्हीएस कंपनीच्या MH23BJ5462 क्रमांकाच्या स्कूटीवर बसुन गोळा करत होते. सदर दिवशी मी हर्ष सतोष सोहणी यांचेकडुन 10,000/- रुपये, सार्थक सेल्सचे मालक रवि शेठ यांचेकडुन 10,000/-रुपये आणि रात्री 07.55 वा चे सुमारास माठवाडा ट्रेडर्स चे मालकाकडुन 10,000/-रुपये असे जमा झालेले एकूण 30,000/- रुपये व मागी शिल्लक मालाचे जमा असलेले 10,000/- रुपये असे एकूण 40,000/- रुपये नगदी रक्कम स्कूटीच्य डीकीमध्ये ठेवले व सदरची स्कुटी ही मी मराठवाडा ट्रेडर्स, शहिंशा मान सेंटरचे बाजुस, मोंढा येथे लावुन शेजारीच सतिष बाहेती यांचे जय मातादी ट्रेडर्स दुकानामध्ये त्यांना दिलेल्या मालाचे पैसे आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्याचेकडून मला मालाचे पैसे मिळाल्याने घरी गेले. घरी गेल्यानंतर स्कुटीची डिकी उघडून पाहीले असता स्कूटीच्या डिकीमध्ये ठेवलेले मालाचे जमा झालेले एकुण 40,000/- रुपये नगदी रक्कम मिळुन आली नाही.पाल यांनी पुन्हा मराठवाडा ट्रेडर्स चे दुकानासमोर जावुन दुकानदारांकडे चौकशी केली असता मला पैश्यांबाबत काही एक माहीती मिळाली नाही म्हणुन स्कुटी लावलेल्या ठिकाणच्या समोरील राजु राठे यांचे किराणा दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मला कोणीतरी दोन इसम स्कुटीजवळ गेल्याचे दिसत आहे त्यापैकी एक अज्ञात ईसम हा स्कुटीच्या डीकी उघडुन डिकी मध्ये ठेवलेले 40,000/-रुपये चोरी करुन घेवुन जात असताना दिसला. तेव्हा खात्री झाली की मालाचे जमा पैसे कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरी करुन नेलेले आहेत.त्यामुळे अज्ञात चोराविरोधात बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रहिदारीचे ठिकाण मोंढा भागातून पैसे चोरल्याने व्यापारी व नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.
वीस दिवस झाले तरी पोलिसांना तपास लागत नसल्याचे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.