सावधान ! पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू.
बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरापासून जवळ असलेल्या वांगी शिवारात मागील महिन्यापासून वांगी गावालगतच्या वस्तीमध्ये शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला होता,त्यात दहा ते बारा शेळ्याचा मृत्यू झाला होता.यामुळे वांगी व जवळपासच्या गाव,खेड्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुन्हा बिबट्याने कोल्हारवाडी डोंगराळ भागात आज;दुपारी चारच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून एका शेतकऱ्याची शेळी ठार केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने बिबट्याच्या भिंतीने शेतकरी शेतातून लवकर घरी परतले.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हारवाडी येथे शेतकरी नामदेव चोरमले यांनी यांच्या घराजवळील शेतात त्यांची शेळी चरण्यासाठी सोडली होती. यावेळी झुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली आणि शेळीला पकडून आपले भक्ष्य केले.काही अंतरावर त्याने शेळी ठार केली. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे उमटल्याने शेतकऱ्याची भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून शेतकरी नामदेव चोरमले यांना वनविभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिकांनी वनविभागाला तात्काळ कळविले असून पथकाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वनविभागाने परिसरातील नागरिकांना रात्री उशिरा किंवा पहाटे बाहेर न पडण्याचे,अफवांवर विश्वास ठेवू नये,बिबट्याची निदर्शनास आला तर आमचाशी संपर्क करावा तसेच जनावरे सुरक्षित जागी बांधून ठेवण्याचे आवाहन केले आहे.