DYSP अनंत कुलकर्णींनी उपोषणकर्त्याला फिल्मी स्टाईल लाथ मारली,व्हिडिओ व्हायरल !
उपोषणकर्त्याला लाथ मारल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.

जालना येथे स्वातंत्र्यदिना निमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना शहरात आल्या असता चौधरी कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी उपोषण सुरू होते.
उपोषणर्त्यांनी पालकमंत्री ध्वजारोहण करून जात असताना त्यांना चौधरी यांनी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तवरील पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेऊन निघाले. पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली. एखाद्या चित्रपटात पोलिस जसे उडी मारून लाथ मारतात, तशी Dysp कुलकर्णी यांनी भररस्त्यात लाथ मारली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
अमित चौधरी व गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिस दाखल घेत नाहीत, असा आरोप चौधरी यांनी केला.आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली, आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांच्या कमरेत लाथ घातली. त्या पोलिस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता? हे मात्र समजू शकले नाही. तरीही अशी फिल्मी स्टाईल लाथ मारणे कितपत योग्य आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पोलीस दलातील जबाबदार अधिकाऱ्याने उपोषण कर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.