अवैध शिंदी,ताडीवर दारूबंदी विभागाची कारवाई;हजारोंचा माल जप्त.
बीड जिल्ह्यात अवैध शिंदी,ताडी,दारूचा महापूर.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील बऱ्याच भागात,गल्ली मध्ये शिंदी,ताडी व दारू विक्री होत असून स्थानिक पोलीस व दारूबंदी अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत शिंदि व ताडीमध्ये केमिकल विषबाधा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.तसेच यामध्ये अल्पवयीन मुले देखील शिंदी पित असून व्यसनाधीन होत असून यामध्ये केमिकल व नशेचे पदार्थ असल्याने विविध रोगास आमंत्रण होत आहे. यामुळे बार्शी नाका भागातील शिंदी विक्री बंद करावी अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील बार्शी नाका,इमामापूर रोडवर असलेल्या दोन पत्र्याच्या शेडमध्ये दारूबंदी विभागाच्या पथकाने दिनांक १५ ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अवैध शिंदी,ताडी व दारू निर्मितीचा मोठा साठा जप्त केला.
दारूबंदी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार,बार्शी नाका भागात काही व्यक्ती अवैधरित्या शिंदी,ताडी तयार करत असल्याचे समजले. तात्काळ पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता, प्लास्टिकच्या बॉटल मध्ये सुमारे १६० लिटर शिंदी,ताडी तयार दारू, तसेच हे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.
कारवाई दरम्यान शिंदी,ताडी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व पाण्याच्या बॉटल व भांडीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालाची किंमत ५,६०० असून, संबंधितांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा १)शेख दस्तगीर शेख शमीर २)नजीर उमर शेख यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारूबंदी अधिकारी सांगतात की,”अवैध मद्यनिर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया नियमितपणे सुरू राहतील.”
ही कारवाई दारूबंदी निरीक्षक एस.व्ही.कांगणे, दुय्यम निरीक्षक ए.ई.तातळे,जवान पी.पी.मस्के, ए.पी.खोसे,महिला जवान एन.एच.नलावडे यांनी केली.