अपघातात एक जागीच ठार.
बार्शी नाका ते तेलगाव चौक रस्त्याचे काम बंद असल्याने रोजच अपघात.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तेलगाव रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून संत गतीने सुरू असल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. एका बाजूने रस्ता सुरू असल्याने गेल्याच महिन्यात तरुणाला टेम्पो ने धडक दिल्याने तरुणाचा जागेत मृत्यू झाला होता. यामुळे कुटुंब व नातेवाईकांनी गुत्तेदार व इंजिनियरवर रोष व्यक्त केला होता.
आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेलगाव रोड वरून लुना वरून बार्शी नाकाकडे येत असताना क्रेन ने बाबू मुनीर रा.अमन कॉलनी वय ६८ वर्ष यांना जोरात धडक दिल्याने बाबू मुनीर यांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या दोन महिन्यापासून बार्शी नाका ते तेलगाव चौक काम संत गतीने सुरू असून रस्ता वाहतूक एकच बाजूने सुरू असल्यानेच हा अपघात झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले या अपघाताला संबंधित कन्ट्रक्शन, गुत्तेदार व इंजिनियर जबाबदार असल्याचा देखील आरोप केला आहे.अपघात स्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळतात पेठ बीड पोलीस कर्मचारी विलास ठोंबरे ,पो.भोले यांनी अपघात स्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.