API दराडेंनी पाठलाग करून वाळूचा हायवा पकडला.
गेवराई तालुक्यातील मोदापुरी येथे जाऊन बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई

बीड(प्रतिनिधी)बीड येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांनी गेवराई येथे जाऊन तब्बल ९ कि.मी. पाठलाग करुन वाळू भरलेल्या हायवावर रात्री कारवाई केली. यामुळे बीडचे पोलीस कारवाई करीत असल्याने गेवराई पोलीस करतात काय? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना गुप्त माहिती मिळाली की, म्हाळस पिंपळगाव येथून एक पिक-अप आणि हायवा वाळू भरुन निघाला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांनी बीड ग्रामीणचे सपोनि बाळराजे दराडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच दराडे यांनी हवालदार नामदेव सानप यांना सोबत घेऊन गेवराईच्या दिशेने धाव घेतली, यावेळी त्यांना संशयित हायवा दिसला तसेच एक कार ही होती. कारने रस्ता आडविण्याचा प्रयत्न करीत हायवाला पळून जाण्यास मदत केली. तरीही दराडे यांनी ९ किलोमीटर पाठलाग करुन सदरील हायवा मोदापुरी येथे पकडला, पण अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार झाला. यावेळी वाहानाची झडती घेतली असता मिळालेल्या कागद पत्रावरुन या हायवाचा क्रमांक एम.एच.१७ बी वाय ५८९८ असा आढळला. सदरील हायवा ताब्यात घेऊन तो गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आला.बीड पोलीस गेवराई पोलीस ठाणे हाती जाऊन कारवाई करतात मग स्थानिक पोलीस आर्थिक तडजोड करून दुर्लक्ष करतात का? असा सवाल उपस्थित होत आहे.
फिकर वय बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे API बाळराजे दराडे ,PSI खुळे मॅडम, पो.नामदेव सानप सह कर्मचाऱ्यांनी केली.