बीड मधील मोटार सायकल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.
सात मोटारसायकली हस्तगत,बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात दुचाकी दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. बीड पोलिसांची दुचाकी चोरीचा तपास लावत अनेक दुचाकी चोरांच्या टोळ्याच्या मुसक्या आवळ्यात यश आले आले.
पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरणाऱ्या ईसमांची माहीती काढुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. आज दिनांक 20.08.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बीड मध्ये विवीध ठिकाणाहुन चोरी गेलेल्या मोटार सायकली हया निलेश विष्णु गायकवाड याने चोरल्या असुन तो सध्या त्याचे राहते घरासमोर उभा आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन ताबडतोब पथकाने सदरील ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेवुन चोरी केलेल्या मोटार सायकली कोठे आहेत या बाबत विचारपुस केली असता त्याने सदरील मोटार सायकली त्याचा साथीदार शिवाजी यलप्पा जाधव याचे कडे विक्री साठी ठेवल्या आहेत असे सांगीतले. त्यावरुन शिवाजी जाधव याचे कडुन एकुण 07 मोटार सायकल मिळुन आल्या. त्याचे कडुन मिळुन आलेल्या मोटारसायकल वरुन खालीलप्रमाणे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 109/2025 कलम 303 (2) बी.एन.एस 2. पोलीस ठाणे बीड शहर गु.र. नं 256/2024 कलम 303 (2) बी.एन.एस 3. पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 303/2024 कलम 303 (2) बी.एन.एस 4. पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 59/2025 कलम 303 (2) बी.एन.एस 5. पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 190/2025 कलम 303(2) बी.एन.एस 6. पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 299/2024 कलम 303(2) बी.एन.एस 7. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र. नं 403/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
अश्या एकुण 07 मोटार सायकली किं. अं 4,40,000/- रुपयाचे जप्त करुन सदरील मोटार सायकल व दोन आरोपी 1. निलेश विष्णु गायकवाड, वय 33 वर्ष, रा. सुभाष कॉलणी पेठ बीड, 2. शिवाजी यलप्पा जाधव, वय 34 वर्ष, रा डोमरी ता. पाटोदा जि बीड यांना पोलीस ठाणे बीड शहर यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आल्या आहेत.
सदरील कामगिरी नवनित काँवत पोलीस अधीक्षक बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार, आनंद म्हस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, बाळु सानप, अर्जुन यादव, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक नितीन वडमारे, सुनिल राठोड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.