
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून खुनाचे सत्र काही कमी होताना दिसत नाही.बीड शहरात रात्री खुनाची घटना घडल्याने बीड जिल्हा पुन्हा हादरला.
धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११:३०वाजता शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तुळजाई चौक, आशा टॉकीज जवळ घडली. सदरील घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती.
बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील विजय सुनील काळे (वय २५) या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत विजय काळे याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदरील घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून गल्लीतीलच मित्रांसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.या घटनेने बीड जिल्हा हादरला असून गुंडाना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे.खुनाचे कारण समजु शकले नाही. सुनील काळे यांच्या मित्राला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.सकाळी आशा टॉकीज येथील चौकात फॉरेन्सिक लॅब टीम पोहोचली असून पुढील तपास करत आहे.