जनावरे चोरणारी टोळी पकडली.
पाच जनावरे व दोन चारचाकी वाहने हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्हयामध्ये जनावरे चोरणाऱ्या ईसमांची माहीती काढुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या द्ष्टीने प्रयत्न सुरु केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 03.09.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नितीन संजय जाधव रा गांधीनगर बीड याने चारचाकी वाहनांमध्ये जनावरे चोरुन आनल्या असुन त्याचे घरी बांधल्या आहेत. सध्या नितीन घरात आहे अशी माहीती मिळाल्यावरुन ताबडतोब पथकाने सदरील ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेवुन चोरी केलेल्या तीन जनावरे हस्तगत केल्या. या बाबत विचारपुस केली असता त्याने कुंभारवाडी परीसरातुन जनावरे चोरल्याचे कबुल केले आहे. त्याचे कडुन खालीलप्रमाणे शेळया चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.त्यास पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिरुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
1.पोलीस ठाणे शिरुर गु.र.नं 255/2025 कलम 303(2) बी.एन.एस
2.पोलीस ठाणे शिरुर गु.र.नं 256/2025 कलम 303(2) बी.एन.एस
3.पोलीस ठाणे शिरुर गु.र.नं 257/2025 कलम 303(2) बी.एन.एस
तसेच दिपक चंदु गुंजाळ रा गांधीनगर यास देखील गांधीनगर येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन जनावरे व चोरी करण्यासाठी वापरात आनलेले वाहन असे जप्त करुन त्याचे कडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आनले आहेत.
4.पोलीस ठाणे गेवराई गु.र.नं 514/2025 कलम 303(2) बी.एन.एस
वरील दोन्ही प्रकरणात एकुण चार आरोपी निष्पन्न झाले असुन पैकी दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. दोन फरार आरोपींचा शोध पोलीस ठाणे शिरुर व गेवराई हे घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने एकुण चार जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन चारही गुन्हयातील चोरीस गेलेली जनावरे व चोरी करण्यासाठी वापरात आणलेले वाहने असा एकुण 8,79,000/- रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस ठाणे गेवराई यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कामगिरी श्री नवनित काँवत, पेालीस अधीक्षक,बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, महीला पोलीस हवालदार स्वाती मुंडे चालक सिध्देश्वर मांजरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.