ब्रेकिंग न्यूज
बीड शहरात आढळला अनोळखी मृतदेह,परिसरात खळबळ.
पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन.

बीड शहरातील माळवेस भागात आज सकाळी नाल्यामध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला. अचानक मृतदेह दिसताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
सध्या मृतदेह कोणाचा आहे याची ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व तर्कवितर्कांचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गावात किंवा शहरात कोणताही व्यक्ती हरवला असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून मृत व्यक्तीची ओळख पटवता येईल असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.