
तरुण गणेश मंडळ कुत्तरविहीर अंबाजोगाई यांनी नुकतेच ढोलताशा पदक सलग तिसऱ्या वर्षीही पटकावले. यासाठी सुरताल संगीत विद्यालयाचे अध्यक्ष आणि सत्कार कमिटीचे अंबाजोगाई उपाध्यक्ष अभय जोशी यांनी शाल ,पुष्पगुच्छ देउन सन्मानित केले. प्रचंड मेहनत करून या मंडळाने सलग तिसऱ्या वर्षीहि हा मान मिळवला या साठी त्यांचे अंबाजोगाई आणि परिसरातून कौतुक केले जात आहे.