ब्रेकिंग न्यूज

गॅस सिलेंडरच्या दोन स्फोटांनी घाटनांदूर हादरले,स्पोट पहा.

अनेक दुकानांचे लाखोंचे नुकसान,जीवितहानी टळली 

अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी भीषण अपघात घडला. सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली. ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली. आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.

आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या दुकानाचे आगीत लाखाचे नुकसान झाले आहे,तसेच आजूबाजूच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अद्यापही आग धुमसत असल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button